नवरात्र ते दसरा निमित्त चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर रोजी यावल तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. नागादेवी, वाघझिरा, नायगाव आणि सावखेडा परिसरातील रस्ते, पूल, साठवण बंधारा आणि इतर विकासकामांचा यात समावेश असून, एकूण पाच कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ होणार आहे.

या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा दुपारी तीन वाजल्यापासून विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

नायगाव येथील साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन दुपारी साडेतीन वाजता, तर कंपाऊंडच्या कामाचे भूमिपूजन चार वाजता होणार आहे. वाघझिरा आश्रमशाळेच्या वॉल कंपाऊंडचे काम दीड कोटी रुपये किमतीचे असून, त्याचे भूमिपूजन संध्याकाळी चार वाजता होणार आहे.

नागादेवी ते जामुनझिरा पुलाच्या अडीच कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संध्याकाळी चार वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे. नागादेवी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी पाच लाख रुपये, तर सावखेडा सीम ते नागादेवी पाईप मोरीच्या कामासाठी आठ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पाईप मोरीच्या कामाचे भूमिपूजन संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

याशिवाय वाघझिरा ते खालकोट पुलासाठी ९० लाख रुपये आणि नागादेवी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी आठ लाख ५० हजार रुपयांच्या कामांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते, त्यांचे निकटवर्तीय सूर्यभान पाटील, भरत चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *