जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात कांद्याच्या रोपांचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण आठ जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या फिर्यादीनुसार, दहिगाव येथे कांद्याच्या रोपांचे दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात जितेंद्र पाटील (वय ५०) यांना अशोक उर्फ किरण दामू पाटील, साधना पाटील, तेजस पाटील आणि अनिकेत पाटील या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यात कुकर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जितेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या फिर्यादीनुसार, कांद्याच्या रोपांचे पैसे मागितल्यावर झालेल्या वादात ३८ वर्षीय महिलेला जितेंद्र पाटील, वैशाली पाटील, प्रशांत पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील या चौघांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दुसऱ्या गटातील चार जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन्ही गटांतील एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
