स्वर्गीय पांडुरंगजी तुळस्कार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली.

हिंगणघाट येथील मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयात स्वर्गीय पांडुरंगजी तुळस्कार यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचे अध्यक्ष उमेश पांडुरंग तुळस्कार यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले.

रक्तदान हे गरजू रुग्णाला जीवनदान देणारे अनमोल कार्य आहे. स्व. पांडुरंगजी तुळस्कार यांच्या स्मृतींना अभिवादन करत या उपक्रमातून मानवतेचा आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *