लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन उपस्थित होत्या. तसेच इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या दीपाली धांडे, शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे आणि गौरी भिरुड यांची उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्षांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *