नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे हिंगणघाटात उत्साहात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अतुलभाऊ वांदिले यांच्या निवासस्थानी हा स्वागत सोहळा पार पडला.

हिंगणघाट येथे अभिजित वंजारी यांचे अतुलभाऊ वांदिले यांच्या पुढाकारातून आयोजित स्वागत सोहळ्यात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी अनिल जवादे, दशरथ ठाकरे, सुनील डोंगरे, अमोल बोरकर, डॉ. बलराज आवचट सर, जगदिश वांदिले यांच्यासह विविध राजकीय क्षेत्रांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थितांनी अभिजित वंजारी यांना शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला. अतुलभाऊ वांदिले यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या स्वागत सोहळ्याने हिंगणघाटच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *