JALGAON | दिवाळी म्हणजे आनंद आणि प्रकाशाचा सण! मात्र, हा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंसोबत वाटून घेण्याचा आदर्श एरंडोलच्या नगराध्यक्षांनी घालून दिला आहे. डॉ. नरेंद्र ठाकूर आणि डॉ. गीतांजली ठाकूर यांनी आदिवासी बांधवांसोबत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.
एरंडोल नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पत्नी तथा नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर यांनी केवडीपुरा येथील आदिवासी वस्तीत जाऊन बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
संभाव्य दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाकूर दाम्पत्याने यंदा अनावश्यक आणि दिखाऊ खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. सणाच्या पूर्वसंध्येला त्यांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच दिवाळीचा फराळ आणि आगामी थंडीच्या पार्श्वभूमीवर उबदार चादरींचे वाटप केले.
या उपक्रमात सुखकर्ता फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. यावेळी शेखर बुंदेले, किसनभाऊ गवळी, राहुल शिंदे, समीर खान, पवन गवळी, शालिक नाईक आणि वासु गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
ठाकूर दाम्पत्याच्या या सामाजिक उपक्रमाचे एरंडोल शहरात कौतुक होत असून, गरजूंसोबत आनंद वाटून घेण्याचा माणुसकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | एरंडोल, जळगाव
#Erandol #Jalgaon #NarendraThakur #GeetanjaliThakur #DiwaliCelebration #SocialWork #SukhakartaFoundation #TribalCommunity #दीपावली #एरंडोल #जळगाव #सामाजिकउपक्रम #आदिवासीबांधव #NTVNewsMarathi
