WARDHA| हिंगणघाट शहरातील काही भागांमध्ये कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गोल बाजार परिसरासह पिंपळगाव रोडवरील एका संशयित ठिकाणाबाबत नागरिकांकडून चौकशीची मागणी होत असून, आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगणघाट शहरातील काही भागांत कथित अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला असून, यामुळे शहराच्या सामाजिक वातावरणात विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
शहरातील गोल बाजार परिसर तसेच पिंपळगाव रोडवरील नाल्याच्या अलीकडे असलेल्या एका कथित हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये कुतूहलासोबतच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या संदर्भातील आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी नेमके काय सुरू आहे, याची पोलिस प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता पडताळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषतः हिंगणघाट पोलिसांनी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या चर्चांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक चौकशी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात अशा स्वरूपाच्या संशयास्पद हालचालींबाबत चर्चा होत असताना प्रशासन याकडे कितपत लक्ष देते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
केवळ चर्चांपुरते हे प्रकरण मर्यादित राहणार की चौकशीतून वस्तुस्थिती समोर येऊन आवश्यक कारवाई होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | हिंगणघाट
#Hinganghat #Wardha #HinganghatNews #PoliceInvestigation #CrimeNews #MaharashtraNews #MarathiNews #NTVNewsMarathi #हिंगणघाट #वर्धा #पोलीसचौकशी #महाराष्ट्रबातम्या
