शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा वर्गमित्र एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. श्रीमती धनाबाई विद्यालय, बाळापूरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी मैत्री, आपुलकी आणि हास्यविनोदांनी वातावरण आनंदमय झाले.

बाळापूर येथील श्रीमती धनाबाई विद्यालयाच्या दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा छोटेखानी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर वर्गमित्र एकत्र आल्याने शालेय जीवनातील आठवणी, जुन्या खोड्या, वर्गातील किस्से, शिक्षकांच्या आठवणी आणि हास्यविनोदांनी वातावरण रंगून गेले.

यावेळी सर्जेराव नळकांडे, डॉ. सचिन शर्मा, प्रितेशचंद्र गुजराती (पप्पू सेठ), शहानवाज खान, संतोष गायकवाड, उदय पंचभाई, सतीश दामोदर आणि गजानन दांडगे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

या आनंददायी भेटीचे औचित्य साधून सर्व मित्रांनी प्रितेशचंद्र गुजराती यांचा वाढदिवसही एकत्रितपणे साजरा केला. अनेक वर्षांनंतर झालेली ही भेट सर्वांसाठी अविस्मरणीय ठरली.

दरम्यान, केवळ छोटेखानी भेटीपुरते मर्यादित न राहता आगामी काळात श्रीमती धनाबाई विद्यालयाच्या दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा आयोजित करण्याचा मनोदय सर्व मित्रांनी व्यक्त केला.

आयुष्याच्या धावपळीत प्रत्येक जण आपापल्या संसारात, व्यवसायात आणि नोकरीत व्यस्त झाला असला, तरी शालेय जीवनातील मैत्रीचे नाते आजही कायम असल्याची प्रचिती या स्नेहमेळाव्यातून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *