अकोल्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! खासदार अनुप धोत्रे यांच्या पुढाकारातून शहरात स्कायनेक्स एरो फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल सुरू होणार असून, येत्या आठवड्याभरात हे केंद्र सज्ज होणार आहे.

खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांमुळे अकोल्यात ‘स्कायनेक्स एरो फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल’ दाखल झाले आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना पायलट होण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे.

यापूर्वी पायलट प्रशिक्षणासाठी युवकांना चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे जावे लागत होते. मात्र आता अकोल्यातच ही सुविधा उपलब्ध होणार असून, रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.

माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासदार अनुप धोत्रे रेल्वे आणि केंद्र सरकारशी संबंधित कामांचा पाठपुरावा करीत आहेत. तसेच छोटी विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अकोल्यात ट्विन इंजिनचे विमान असून, महापालिकेने ई-बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हवाई वाहतूक आणि शहराच्या विकासासाठी खासदार अनुप धोत्रे, ॲड. पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदाताई खेडकर आणि समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत.

येत्या आठवड्याभरात प्रशिक्षण केंद्राची आवश्यक तयारी पूर्ण होऊन पुढील कामकाज सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष, अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *