जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथून दुःखद बातमी समोर आली आहे. ह.भ.प. उद्धव महाराज यांच्या कन्या वैष्णवी ठाकूर यांचे वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

दहिगाव येथील वैष्णवी उद्धव ठाकूर, वय २० वर्षे, यांचे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

वैष्णवी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्या ह.भ.प. उद्धव महाराज यांच्या कन्या होत.

त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता काढण्यात येणार आहे.

वैष्णवी यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *