अकोला शहराच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शिवनी विमानतळावर नव्याने फ्लाइंग स्कूल सुरू झाले आहे. या फ्लाइंग स्कूलची खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी पाहणी करत प्रशिक्षण सुविधा आणि विमानतळाच्या आगामी विकासाचा आढावा घेतला.

अकोला शहरातील शिवनी विमानतळ येथे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी खासदार मा. श्री. अनुपभाऊ धोत्रे यांनी नव्याने सुरू झालेल्या फ्लाइंग स्कूलची पाहणी केली.

यावेळी फ्लाइंग स्कूलच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, उपलब्ध सुविधा तसेच विमानतळाच्या आगामी विकासाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.

अकोला शहराच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी शिवनी विमानतळ महत्त्वपूर्ण ठरणार असून, या पाहणीदरम्यान विमानतळाच्या पुढील विकासासंदर्भातील बाबींचाही आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप अकोला महानगर अध्यक्ष जयंतराव मसने यांच्यासह संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *