यावल येथे क्रांतीसूर्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त टोकरे कोळी जमातबांधवांकडून अभिवादन करण्यात आले. प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमातून आदिवासी एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा संदेश देण्यात आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा’निमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यात आले.
या प्रसंगी नितीन भाऊ सपकाळे, मुकेश भाऊ कोळी, जितू भाऊ कोळी, किरण कोळी, संतोष तायडे, दुर्गेश कोळी यांच्यासह टोकरे कोळी जमातीचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
