यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. बँकेच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

१७ नोव्हेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष खासदार संजय देशमुख, उपाध्यक्ष नितीन भूतडा आणि विजय जाधव यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी बँकेतील अनिष्ट तफावत दूर करणे, पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यावर अधिकारी नियुक्त करणे, शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ देणे, सहकार प्रशिक्षण केंद्र आणि ग्रामीण विकास अकॅडमी सुरू करणे, तसेच बँकेसाठी आवश्यक जागा व अधिकारी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागण्या करण्यात आल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वित्त आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना बँकेच्या समस्यांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

बँकेला शेतकऱ्यांच्या हक्काची सक्षम संस्था बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपाध्यक्ष नितीन भूतडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *