औरंगाबाद : एका बंद वाड्यात एका अनोळखी पुरूषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना वाळुज एमआयडीसी परीसरातील रांजणगाव शे. पु उघडकीस आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुन की, त्याने आत्महत्या केली या विषयी गुढ कायम आहे.

रांजणगाव (शेणपुंजी) येथील सावता महाराज मंदिराजवळील गल्लीत असलेल्या या वाड्यासमोर काही मुले खेळत होती. खेळता खेळता ती पडक्या वाड्याकडे गेल्याने तेथून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे समोर आले. ही माहिती नागरिकांना दिल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता या वाड्यातील एका खोलीमध्ये हा मृतदेह आढळून आला.

हा व्यक्ती अंदाजे ३० वर्षीय असून मृतदेह एका पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत होता. अनेक दिवसांपासून पडून असल्याने तो कुजला होता. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे, पोलीस अंमलदार दशरथ खोसरे, अविनाश ढगे, धनराज राठोड, संघराज दाभाडे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तो घाटीत दाखल केला. मृतदेहाची ओळख पटली नसली तरी हा खून असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.