भारतीय जनता पार्टी कार्यालय, अकोला येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या रक्षणाची सर्वांना शपथ देण्यात आली. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवरील भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर पोलीस अधिकारी, जवान व पोलीस अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
खासदार अनुप धोत्रे यांचे स्टेटमेंट :
“संविधान हे आपल्या देशाचा आत्मा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समता, व्यक्ती स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये आपण प्रत्येकाने जपली पाहिजेत. संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या बलिदानामुळे आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या बलिदानाला आम्ही कधीही विसरणार नाही.”
आमदार रणधीर सावरकर यांचे स्टेटमेंट :
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे देशाला एकसंध ठेवणारी सर्वात मोठी शक्ती आहे. मुंबई हल्ल्यातील शहिदांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. संविधानाच्या मार्गावर चालूनच दहशतवादाचा मुकाबला करता येईल.”
यावेळी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेण्यात आली.
यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर, डॉक्टर किशोर मालोकार, सरचिटणीस माधव मानकर, संजय गोटफोडे, ॲड. देवाशिष काकड, विद्याधर काकड, महिला आघाडी अध्यक्ष वैशाली शेळके, परिमल कांबळे, सुभाष खंडारे, राजेंद्र गिरी, उकडराव सोनोने, उमेश श्रीवास्तव, शरद ढगे, जितेन देशमुख, सुनील बाठे, संजय झाडोकार, शिवलाल इंगळे, जमीर खान, पुरुषोत्तम पानझडे आदी उपस्थित होते.
