डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विखे पाटील हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्भवती महिला, नेत्ररुग्ण, बालरुग्णांसह सर्वसामान्यांना विविध तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रियांचा लाभ मिळणार आहे.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना आर्थिक भाराविना उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

याअंतर्गत गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी, ॲनॉमली स्कॅन, रक्त तपासण्या, सामान्य व सिझेरियन प्रसूती तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, २डी इको आणि अँजिओग्राफीसारख्या तपासण्यांसह मोतीबिंदू व अन्य आवश्यक नेत्रशस्त्रक्रियांचाही लाभ मोफत मिळणार आहे. वीस वर्षांखालील मधुमेहग्रस्त रुग्णांना इन्सुलिन आणि लहान मुलांना आंतररुग्ण उपचारसेवाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हॉस्पिटलमध्ये विविध सुपरस्पेशालिटी उपचार, अवयव प्रत्यारोपण केंद्र आणि शासनाच्या आरोग्य योजनांद्वारे गरजू रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याची ही संकल्पना रुग्णसेवेतील सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *