अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. पहिल्या महिन्याचे संपूर्ण मानधन त्यांनी अहिल्यानगरमधील स्नेहालय संस्थेला देण्याचे ठरवले असून, पुढेही दर महिन्याचे मानधन वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना देण्याचा संकल्प केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी मिळणाऱ्या मानधनाचा वैयक्तिक लाभ न घेता ते सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या महिन्याचे संपूर्ण मानधन अहिल्यानगरमधील स्नेहालय या सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे.

वंचित, निराधार आणि गरजू घटकांसाठी स्नेहालय संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अशा सामाजिक संस्थांना आर्थिक बळ मिळावे आणि त्यांच्या कार्याला हातभार लागावा, या उद्देशाने डॉ. विखे पाटील यांनी मानधन देण्याचा निर्णय घेतला.

हा उपक्रम केवळ पहिल्या महिन्यापुरता मर्यादित नसून, अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दर महिन्याला मिळणारे मानधन जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना देण्यात येणार आहे.

सहकार क्षेत्रातील जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक संस्थांच्या कार्यालाही आर्थिक आधार देण्याच्या या निर्णयातून समाजाप्रती बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *