राज ठाकरेंची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ सत्तेपासून बरीच लांब आहे. पण ‘कृष्णकुंज’ होणारी गर्दी कमी होत नाही आणि अनेक जण त्यांचाकडे आपले प्रश्न घेऊन जायचं थांबत नाहीत.
मुंबईची ओळख असलेले डबेवाले, कोळी भगिनी, कोरोनामुळे आर्थिक संकटं आलेल्या व्यावसायिक क्षेत्रांचे प्रतिनिधी असोत किंवा कमी पडणाऱ्या सुविधांमध्ये काम करणारे डॉक्टर्स असोत, राज ठाकरेंनी त्यांच्या प्रश्नावर बोलावं म्हणून सगळे त्यांना भेटायला जातात. सभागृहांमध्ये नगण्य प्रतिनिधित्व आणि सत्तेपासून सातत्यानं लांब असणाऱ्या राज यांच्याकडे सगळे का जातात?