हिंगोली : मागील दोन वर्षांपासून कोरोना संकाटामुळे बंद असलेले लग्नं सोहळे हळुहळु सुरळीत सुरू झाले असुन सध्या लग्नसोहळे तुरळक प्रमाणात साजरे केले जात असुन अनेक जण लग्न पत्रिकेतुन हजारो रुपये खर्च करून लग्नपत्रिका ही फक्त लग्नाला येण्यासाठी आमंत्रण हा समज असतो परंतु सेनगाव तालुक्यातील मौजे जामठी येथील एका वधुच्या पिताने लग्नपत्रिकेवर अनेक संदेश देत जनजागृती केली आहे
जामठी येथील संदेश शेषराव जाधव यांच्या मुलीचे लग्न दि 21 फेब्रुवारी रोजी होणार असुन शेषराव जाधव यांनी मुलीच्या लग्नाला दिल्या जाणाऱ्या लग्नपत्रिकेवर स्वच्छता मिशन,पर्यावरण वाचवा देश वाचवा,आधी विद्यादान मग कन्यादान, नशा पासुन रहा दुर जिवन सुख मिळवा भरपूर, रक्तदान महादान,मुलगा शिकला तर एक घर उजळेल मुलगी शिकली तर दोन घर उजतील असा संदेश देणारी लग्नपत्रिका देत लग्नं समारंभासाठी आमंत्रण देत लग्नपत्रिकेच्या माध्यमातून जनजागृती तसेच पर्यावरण विषयक संदेश दिला आहे.