हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आणि गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन कावरखे साई यांच्या वाढदिवसानिमित्त श्री बलखंडेश्वर कब्बड्डी संघाच्या वतिने गोरेगांव कब्बड्डीचे सामने ठेवण्यात आले होते
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजेश उर्फ भैय्या पाटील गोरेगांवकर आणि सुनिल भैय्या पाटील गोरेगांवकर यांच्या विशेष उपस्थितीत गजानन कावरखे साई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी गोरेगाव येथील सरपंच दासराव कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे साहेब,माजी सरपंच भास्करराव पाटील, गोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य,तसेच आसपासच्या गावातील सरपंच यांची उपस्थिती होती.यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा गजानन कावरखे साई यांच्या वतिने स्वागत करण्यात आले.नंतर कब्बडी सामन्याला सुरुवात करण्यात आली.