हिंगोली : येथील गोदावरी अर्बन चे संस्थापक आ.खासदार हेमंत पाटील,संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. राजश्रीताई पाटील मॅडम, व्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्री. धनंजय तांबेकर सर , मुख्यालय चिफ मॅनेजर सौ. सुरेखा दवे मॅडम, मुख्यालय प्रिन्सिपल मॅनेजर श्री. विजय शिरमेवार सर, मुख्यालय मार्केटिंग मॅनेजर श्री. महेश केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त सकाळी 9:00 वाजता हिंगोली येथील गोदावरी अर्बन शाखा हिंगोली येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर गोदावरी अर्बन व गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती सौ.रुपालीताई पाटील गोरेगावकर, शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ रेखाताई देवकते, महिला शिवसेना तालुका प्रमुख सौ. सीमाताई पोले नाईक, महिला शहर प्रमुख आठवले ताई, शिवसेना शहर संघटक श्री किशोर मास्ट, शाखा व्यवस्थापक अंकुश बिबेकर, रंजना हरणे, जयवंत देशमुख, विशाल नाईक, रक्षंदा मुक्कीरवार, ममता ओझा, श्रुती मद्रेवार, प्रवीण पाईकराव, शुभम टवले, गोदावरी फाउंडेशनचे शिवाजी पातळे व सौ. सोनल सुलभेवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी अर्बन व गोदावरी फाउंडेशन ने केले होते.