हिंगोली : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पप्पु चव्हाण तर सचिव पदी डॉ.सतिश शिंदे यांची एक मताने निवड करण्यात आली. समितीच्या कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोंढे, कोषाध्यक्ष नितीन अवचार, उपाध्यक्ष मिलिंद उबाळे, उमेश नागरे यांचीही निवड करण्यात आली आहे. उर्वरित विस्तारीत कार्यकारिणीची निवड रविवार दि.३० जानेवारी रोजी समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची शिवजन्मोत्सव नियोजन व निवड बैठक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव २०२१ च्या अध्यक्षा सौ.छायाताई मगर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२६ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयाला अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. या बैठकीला समितीचे मार्गदर्शक विनायकराव भिसे पाटील, जि.प.उपाध्यक्ष मनिष आखरे, भुषण देशमुख, मनोज आखरे, शिवाजीराव ढोकर पाटील, सुनिल पाटील गोरेगावकर, ऍड.अमोल जाधव, छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा समितीचे सचिव त्र्यंबकराव लोंढे, सदस्य खंडेराव सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीचे प्रास्ताविक समितीचे मार्गदर्शक कल्याण देशमुख यांनी केले. या बैठकीत शिवजन्मोत्सवा संदर्भात व्यापक नियोजन, तयारी संदर्भात उपस्थित शिवप्रेमी बांधवाच्या सुचना मागविण्यात आल्या. यानंतर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पप्पु चव्हाण तर सचिव पदी डॉ.सतिश शिंदे यांची एक मताने निवड करण्यात आली. समितीच्या कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोंढे, कोषाध्यक्ष नितीन अवचार तर उपाध्यक्ष म्हणुन मिलिंद उबाळे, उमेश नागरे यांची निवड करण्यात आली. नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. विस्तारीत कार्यकारिणी तयार करण्यासाठी बैठक रविवार दि.३० जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सव नुतन अध्यक्ष पप्पु चव्हाण यांनी आपल्या मनोगतात यंदाचा शिवजन्मोत्सव कोविड नियमावलीचे पालन करुन मोठया उत्साहात व भव्य दिव्य स्वरुपात सर्व समाजातील बांधवाना सोबत घेवुन साजरा करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती २०२१ च्या अध्यक्षा सौ.छायाताई मगर यांनी अध्यक्षीय समारोप केला. उपस्थितांचे आभार सचिव डॉ.सतिश शिंदे यांनी मानले. या बैठकीला सौ.ज्योतीताई कोथळकर, विद्याताई पवार, वंदनाताई आखरे, दिलीप घ्यार, डॉ.प्रल्हाद शिंदे, नामदेव पवार, रमेश चेंडके, ऍड.नामदेव सपाटे, श्याम सोळंके, अशोक वानखेडे, कावरखे, जाधव यांच्यासह शिवप्रेमी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.