section and everything up until
* * @package Newsup */?> हिंगोली : पालकमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवस हिंगोली जिल्हा दौऱ्यावर.... | Ntv News Marathi

हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड या दि. 25 व 26 जानेवारी, या दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे,,, मंगळवार, दि. 25 जानेवारी मंगळवार रोजी दुपारी 1.30 वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व 3.30 वा. पर्यंत राखीव. 3.40 ते 4.00 वा. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 4.00 वाजता डिग्रस कऱ्हाळे येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोलीकडे प्रयाण. 4.10 वा. ते सांय. 5.00 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. सांय. 5.00 ते 6.00 वा. राखीव. 6.00 वाजता राजयोग मेडिकल हिंगोली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने हेल्मेटचे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन . 7.00 ते 8.00 वा. माजी मंत्री श्रीमती रजनीताई सातव, कळमनुरी यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती.
बुधवार, दि. 26 जानेवारी बुधवार रोजी सकाळी 9.15 वाजता संत नामदेव कवायत मैदान, हिंगोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. 9.40 वाजता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रकाशित होणाऱ्या व्हीजन डॉक्यूमेंट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, 9.50 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमार्फत शहीद सैनिक, वीरमातांना जमीन वाटपाचा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता आय मार्ट नांदेड रोड, हिंगोली येथे मॉलचे उद्घाटन, 10.10 वाजता नारायण नगर हिंगोली येथील देवकर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. 10.30 वाजता कोथळज रोड, परिवार मॉल जवळ, हिंगोली येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अद्यावत ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. 10.50 वाजता सह्याद्री हॉस्पिटल येथून मोटारीने श्री गुरु गोविंदसिंघजी, नांदेड विमानतळाकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *