विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोळसा येथील नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते भव्य सत्कार

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे कोळसा येथील सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य आणि नुकतीच पार पडलेल्या सेनगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते करण्यात आला

.यावेळी सत्कारमूर्ती सदस्य गोडमुखे भिकाजी, पठाण अक्रमखा, बेंगाळ किसन, भगत रामप्रसाद, मसुडकर मधुकर, वावळ विलास, सय्यद शौकत, सय्यद लियाकत, अंकुशराव बेंगाळ,कैलास देवळे,महालिंग तोंडे, काशीराम बेंगाळ तसेच सेनगाव नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवक दत्तराव तिडके ,अमोल तिडके, गजाननराव देशमुख, राजकुमार देशमुख, संदीप बहिरे या सर्व सदस्यांचा सत्कार भास्करराव बेंगाळ आणि अंकुशराव बेंगाळ सर यांनी केला. यावेळी व्यासपीठावर विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ व सचिव अंकुशराव बेंगाळ , प्राचार्य अभिषेक बेंगाळ, गजानन करंडे ,विलासराव गीते हे उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन श्री संतोषराव बेंगाळ यांनी केले.