पालघर –बोईसर पास्थळ येथील विजयकॉलनी व परिसरातील नागरिकांच्या सोयीकरिता व आलेल्या मागणीनुसार तालुका संघटक विधुर पाटील यांच्यासोबत केलेल्या पाहणीनंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेनेचे कुंदन संखे यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून निर्धार सेवा संस्थेच्या माध्यमातून व शिवसेनेच्या वतीने विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना सर्व मान्यवरांनी कुंदन संखे यांनी लोकांच्या असलेल्या गरजेनुसार स्वतः पुढाकार घेऊन करीत असलेल्या या सामाजिक उपक्रमाबाबत आभार मानले व विसावा शेड मुळे परिसरातील नागरिकांना निवांत बसण्याचे व वृत्तपत्र वाचनालयाच्या माध्यमातून एक विरंगुळा मिळेल ही भावना व्यक्त केली तर कुंदन संखे यांनी विसावा शेड चे उदघाटन करण्यात येऊन याहीपुढे पालघर जिह्यात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणासोबत सातत्यपूर्ण सामाजिक कार्य करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मंगेश भोईर, पंचायत समिती सदस्या श्वेता देसले, माजी सरपंच मंजुळा गोवारी, माजी उपसरपंच गोपीचंद घरत, गणेश घरत, माजी सदस्य अंकुश घरत,माजी पंचायत सदस्या संध्या खुंटे, माजी सरपंच ऍड . तृप्ती संखे,माजी सदस्या अपर्णा घरत, आशा दुधवडे ,सालवड उपसरपंच कविता राऊत , शिवसेना शाखाप्रमुख राजेश खुंटे , उपशाखाप्रमुख भुपेंद्र संखे, लालशा पठाण , गटप्रमुख शाम देशमुख यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.