पालघर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक मा.श्री. निलेशजी सांबरे साहेब यांनी आपल्याला दिलेला वसा आहे स्वकमाईतून समाजसेवेचा सतत अथक अविरत! त्यामुळे स्वाभाविकच अप्पांचा वाढदिवस असलेला हा महिना सेवाभावी उपक्रमांचा म्हणूनंसजरा करण्यात येणार आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष- श्री. निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त डहाणू तालुक्यातील दाभाडी पाटीलपाडा येथे दिनांक – १/०४/२०२२ रोजी आरोग्य शिबीर घेण्यात आले
या शिबिरा मध्ये एकूण २७७ नागरिकांनी याचा लाभ मिळाला असून १५८ नागरिकांनी डोळे तपासून घेतले तर १५ जणांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून ११९ चष्मे वाटप करण्यात आले असून ११९ जनची तपासणी करण्यात आली असून इतर ७ जणांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या
