पालघर : बोईसर औद्योगिक वसाहतीमधील विराज ग्रुप च्या कंपनीमध्ये युनियन स्थापन वरून झालेल्या गदारोळ मध्ये कंपनीमधील काही कर्मचारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमध्ये पोलीस मध्यस्थी करण्यासाठी गेले असता काही पोलिसांनाही मारहाण झाली त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले असून मोठा पोलिसांचा फौजफाटा विराज कंपनीच्या दिशेने निघाला आहे विराज ग्रुप मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दोन युनियन स्थापने वरून खडाजंगी चालली होती यामध्ये मुंबई लेबर युनियनच्या बाजूने साठ टक्क्याहून अधिक कामगार उभे राहिले व त्यांनी लेबर युनियन च्या नावाखाली नोंदणीही केलेली आहे

मात्र कंपनी व्यवस्थापन लेबर युनियनला थारा देत नसून इतर युनियनला सहकार्य करून मुंबई लेबर युनियनला कंपनीमध्ये शिरू देत नाही यावरूनच गेल्या दोन चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती व आता ही नाराजी दगडफेक व मारहाणीत रूपांतर झाले तर जवळपास वीस जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा ही समावेश आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *