पालघर : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ,महाराष्ट्र मार्फत डहाणू तालुक्यात बोर्डी व चिंचणी येथे श्री भगवान महादेव सांबरे वडिलांच्या नावे मोफत MPSC,UPSC व सर्व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे व डहाणू शहरामध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा निलेशजी भगवान सांबरे साहेब व अंजली सावे मॅडम यांच्या हस्थे करण्यात आले .

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र मार्फत डहाणू तालुक्यात बोर्डी व चिंचणी आणि डहाणू शहरामध्ये मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करून फक्त शिपाई किंवा क्लर्क न होता जास्तीत जास्त विद्यार्थी हे मोठे अधिकारी घडले पाहिजेत व आपल्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा असे मत मा निलेशजी सांबरे साहेबांनी यावेळी व्यक्त केले तसेच शैक्षणिक व आरोग्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असून लवकरच डहाणू तलासरी तालुक्या करिता रुग्णासाठी मोफत अंब्युलंस उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच तलासरी तालुक्यात सुत्रकर,कोचाई बोरमाळ, गिरगाव डोल्हारपाडा,गिरगाव भूजाडपाडा या 4 ठिकाणी जिजाऊ शाखा उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिजाऊ जिल्हाध्यक्ष जावेद खान,तलासरी तालुका अध्यक्ष वानशा दुमडा,डहाणू शहर अध्यक्ष कल्पेश भवर,पंकज वसावे तलासरी नगरसेवक,प्रणय पटेल शहर उपाध्यक्ष,पिंटू रिंजड,अफजल खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनीधी :-प्रविण बाबरे