पालघर : खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाचा उत्कर्ष साधण्याच्या ध्येयाने तलासरी तालुक्यात जिजाऊ संघटनेच्या बोरमाळ पाटीलपाडा, सुत्रकार गोवरशेतपाडा,गिरगाव दोल्हारपाडा,गिरगाव भुजाडपाडा ह्या ४ शाखांचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

ह्या वेळेस संस्थेचे संस्थापक मा.श्री निलेश जी भगवान सांबरे साहेब यांच्या हस्ते सर्व शाखांचे उद्घाटन झाले शाखेतील सर्व सदस्यांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तेथील पाड्यायामधील लाईट पाणी, विज त्यांच्या असलेल्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडून देण्याचे आश्वासन दिले.

तसेच गिरगाव भुजाडपाडा येथील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वनपट्टे जिजाऊ संस्थेचा पाठपुराव्याने त्यांना मिळवून देण्यात आले गिरगाव भुजाडपाडा येथे शाखेचा उद्घाटनाच्या वेळेस एकूण 27 ग्रामस्थांना निलेश सांबरे साहेबांच्या हस्ते वनपट्टे वाटप करण्यात आले.ग्रामस्थांनी संस्थेचे व निलेश सांबरे साहेबांचे आभार मानले

प्रतिनीधी :-प्रविण बाबरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *