तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कॅलेक्स केमिकल आणि फार्मास्यूटीकल्स या कारखान्यात घातक रसायनांचे ड्रम जमिनीमध्ये पुरून ठेवल्या चा धक्कादायक प्रकार उघडकीस.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून उग्र वास असलेल्या घातक रसायनांचा साठा बाहेर काढण्यात आला आहे.

घातक रसायनांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूरचे उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांच्याकडून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे