जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याने तलासरी तालुक्यातील गिरगाव डोल्हारपाडा येथील उपकेंद्र सुरू..

पालघर : तलासरी तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र वसा अंतर्गत येणारे उपकेंद्र गिरगाव डोल्हारपाडा मागील तीन-चार वर्षापासून बंद अवस्थेत दिसून येत होते गिरगाव डोल्हारपाडा परिसराचा भाग अत्यंत दुर्गम असून भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने त्यांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते ही बाब जिजाऊ संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मा नि लेशजी सांबरे यांच्या लक्षात येताच संस्थेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा आरोग्य अधिकारी, तलासरी तालुक्यातील पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांना पत्रव्यवहार संस्थेमार्फत करण्यात आला त्यामध्ये उपकेंद्र हे तात्काळ सुरू करून तेथील लोकांच्या आरोग्याबाबत ची अडचणी दूर कराव्यात अशी मागणी केली होती जिजाऊ संस्थेच्या या मागणीला २ दिवसात यश आले

गिरगाव उपकेंद्र हे तेथील ग्रामस्थांसाठी सुरू करण्यात आले त्याची प्रत्यक्ष पाहणी तालुक्याचे गट विकास अधिकारी मा. श्री राहुल म्हात्रे साहेब तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल सर जिजाऊ संघटना तालुका अध्यक्ष वनशा दुमाडा साहेब महिला अध्यक्ष संगीता वाडू जिजाऊ संघटना उपाध्यक्ष अजय उंबरसाडा उपस्थित होते ह्या वेळेस येथील ग्रामस्थांनी यावेळी संस्थेचे तसेच मा.श्री निलेश जी भगवान सांबरे साहेबांचे आभार मानले