पालघर : महाराष्ट्र शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी अंतर्गत पालघर विधानसभा क्षेत्रात पालघर विधानसभेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या माध्यमातून पाच नवीन कार्यालय बांधणी साठी मंजुरी मिळाली आहे.ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात ज्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नाहीत अश्या ग्रामपंचायत इमारती साठी शासनाच्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत ग्रीन बिल्डिंग संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना व वायुजीवन,पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर,पर्जन्य जलपुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य वापर करण्याचा शासन निर्णय आहे.

आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी त्यांच्या पालघर विधानसभा क्षेत्रातील दाभोन ता.डहाणू आणि पालघर तालुक्यातील आलेवाडी, परनाळी,वेंगणी,नांदगाव तर्फे तारापूर आदी ग्रामपंचायतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते.त्यास ग्रामविकास विभागाच्या वतीने मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *