सोलापूर:कुर्डुवाडी नगर परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी वारंवार संबंधितां विरोधात पुुुराव्यानिशी तक्रार दाखल केेेेलेल्या आहे. कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे अन्यथा सर्व तहसील कार्यालयांवर शिंगाडे मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष गुलाब शेख (मामू) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, कुर्डुवाडी नगर परिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी वारंवार संबंधितां विरोधात तक्रार दाखल केली आहे. संघटनेमार्फत दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व तहसील कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. तरी आपल्या कार्यालयातुन कुठलीही दखल घेतली नाही. भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठीशी घालणे ही घटनेवर गदा घालण्यासारखी बाब आहे. जर संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश न दिल्यास आम्ही आमच्या संघटनेमार्फत महाराष्ट्रातील संपुर्ण तहसील कार्यालयावर लोकशाही मार्गाने शिंगाडे मोर्चे काढणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा ईशारा दिला आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी