हिंगोली येथे दि 12 मार्च गुरुवार रोजी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर यांच्या मराठवाडा दौऱ्या निमित्त हिंगोली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे, प्रदेश सरचिटणीस राहुलभैय्या लोणीकर, प्रदेश चिटणीस अरुणजी पाठक, जिल्हा प्रभारी गणेश गोमचाळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू भैया चव्हाण,फुलाजिराव शिंदे,के.के.शिंदे,तालुका अध्यक्ष संतोष टेकाळे,शिवाजीराव मुटकुळे,जि.प.सदस्य अमोल जाधव,जिल्हा सरचिटणीस हिम्मतराव राठोड,सचिन जायभाय,युवा वारियर्स जिल्हाध्यक्ष अक्षय भोसले,तालुका सरचिटणीस गोविंद बेंडे, तालुका अध्यक्ष सुनिल बागल,अतिष देशमुख,अंकुश काळे,ऋतिक पाटिल,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद खराटे,प्रभाकर तिडके,तालुका अध्यक्ष मंचक कदम,अंगद कदम,अंकुश क्षीरसागर तसेच सेनगाव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी माधव टाले व कळमनुरी भाजपा युवा तालुका अध्यक्ष पदी बंटी उर्फ परमेश्वर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच दिग्रस पाटी येथे भाजपा युवा मोर्चा युवा वारियर्स शाखाचे उद्घाटन , वसमत तालुक्यातील करंजाळा येथे भाजपा युवा मोर्चा युवा वाली अशी शाखाचे उद्घाटन प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *