बुलडाणा : संपूर्ण जगासमोर कर्करोग या आजाराने ग्रासलेले असताना भविष्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेश अध्यक्ष संदीपदादा भंडारी यांच्या पुढाकारातून संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.. या अभियानाअंतर्गत मलकापूर तालुक्यासाठी 11 मे ते 17 मे 2022 पर्यंत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन आ लोकनेते श्री चैनसुखजी संचेती ह्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश सचिव व ह्या अभियानाचे प्रदेश समन्वयक डॉ. योगेश पटणी यांनी केले आहे.

कर्करोगामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागतो सध्या परिस्थिती ल बदलते जीवन शैली, भेसळ युक्त आहार, व्यसन या आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे या कर्करोगाचे निदान व कर्करोगास कारणीभूत जीवनशैली बद्दल जनजागृती व्हावी अशा उद्देशाने भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने 26 जानेवारी 2022 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान या विशेष उपक्रमास सुरुवात केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कॅन्सर निदान होणे करिता आवश्यक उपकरणांसह असलेल्या व्हॅन द्वारे मोफत स्वरूपात कॅन्सरचे निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा मलकापूर परिसरातील जनतेला सुद्धा लाभ व्हावा अशा उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून 11 मे 2022 रोजी चांडक विद्यालय, 12 मे झंवर हॉस्पिटल, 13 मे भारत लॉन्स, 14 मे ग्रामपंचायत मंगल कार्यालय वडोदा, 16 मे ग्रामपंचायत कार्यालय विद्युत नगर, 17 मे लखानी जीन अशा विविध ठिकाणी या शिबिराचे मोफत स्वरूपात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपा तालुका अध्यक्ष संजय काजळे, शहराध्यक्ष मिलिंद डवले प्रदेश सचिव डॉ योगेश पटणी, शंकरराव पाटील, संतोष बोंबटकार यांनी दिली. याप्रसंगी पत्रकार वीरसिंह राजपूत, मनोज पाटील, नारायण पानसरे, अनिल गोठी, विजय वर्मा, समाधान सुरवाडे, धीरज वैष्णव, श्रीकृष्ण तायडे, दीपक ईटणारे, नागेश सुरंगे, यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते