पालघर : शिवसेनेचे नेते आणि ठाण्यात शिवसेनेला बळकट करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी मांडला आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली आहे. हा सिनेमा आज पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये ह्याचा उत्साह पाहायला मिळाला.

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील केटी सिनेमागृहात पालघर जिल्ह्याचे माजी कृषी सभापती सुशील चुरी यांनी या सिनेमाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख राजेश शाह आमदार श्री. श्रीनिवास वनगा ,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ वैदेही वाढण , उपजिल्हा प्रमुख राजेश कुटे , विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे , जिल्हा महिलासंपर्क प्रमुख सौ. ममता चेम्बूरकर पालघर तालुका महिला संघटक सौ निलम म्हात्रे , मा जिल्हापरिषद सदस्या सौ शुभांगी कुटे , मा.पंचायत समिति सभापती रवींद्र पगधरे , पंचायत समिती सभापती सौ मनीषा पिंपळे पालघर तालुका युवा सेना अधिकारी दीपक मोरे व इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी , महिला आघाडी , युवा सैनिक , व लोकप्रतिनिधि आदि उपस्थित होते.

हा सिनेमा प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्याची कारकिर्द सांगणार आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई, क्षितीश दाते आणि अभिनेत्री श्रुती मराठे हे कलाकार या मंचावर पाहायला मिळणार आहेत या चित्रपटाची सर्वत्र खूप चर्चा असून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे.