(बोईसर) धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर बनविला गेलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठाणे पालघर मध्ये तर धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात काम केलेले हजारो शिवसैनिक असून त्यांनी आपल्या हयातीत त्यावेळच्या ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागावर म्हणजेच आताच्या पालघर जिह्यावर विशेष प्रेम केले . कुठलाही सामाजिक प्रश्न असो अथवा अडचण ते कुठल्याही प्रसंगात अगदी मध्यरात्रीही पोहोचायचे आणि म्हणूनच त्यांच्या जीवनपटावर प्रदर्शित झालेला धर्मवीर हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवसेनेचे कुंदन संखे यांनी बोईसर येथे विनामूल्य शो ठेवला होता.
याप्रसंगी ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत काम केले ते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उदय बंधू पाटील, सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, विनोद अण्णा पाटील यांचा सत्कार कुंदन संखे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस महिला संपर्कप्रमुख ममता चेंबूरकर, युवा सेना जिल्हा विस्तारक आशिष पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, उपजिल्हाप्रमुख राजेश कुटे, पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा, जिल्हा परिषद सदस्य मंगेश भोईर, माजी सदस्य शुभांगी कुटे, तालुका संघटक नीलम म्हात्रे, विभागप्रमुख राजू पाटील, सरपंच लक्ष्मी चांदणे, उपसरपंच अशोक शाळुंके यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.