उस्मानाबाद : उमरगा येथील लोटस पोद्दार लर्न स्कूल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद व लोटस पोद्दार लर्न स्कूल उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने दि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट जुडो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ मे ते २५ मे २०२२ अंतर्गत दहा दिवसीय स्पोर्ट्स समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे . या कॅम्प चे उद्घाटन दि .१६ रोजी लोटस पोदर लर्न स्कूल उमरगा चे सचिव विशाल कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्रीकांत वारुडे, प्रमुख अतिथी म्हणून टायगर्स तायकाँदो कराटे अकॅडमी चे अध्यक्ष अमोल पाटील, मास्टर प्रताप राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती .
दहा दिवसीय चालणाऱ्या या स्पोर्ट्स समर कॅम्प कॅम्पमध्ये आर्चरी ,जुडो, स्केटिंग, सेल्फ डिफेन्स , सिलंबम ,कराटे ,एरोबिक्स, काठी, जिम्नॅस्टिक्स इत्यादी क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे . या प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रतिसाद मिळत आहे. प्रा शैलेश महामुनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तर डॉ पंडित, कविता राठोड, अॅड . शिल्पा सुरवसे, रीना बनसोडे यांची उपस्थिती होती .
या प्रशिक्षण शिबिरासाठी विशाल पवार, ओम राठोड, रोहिणी बनसोडे ,आनंद गवळी, अश्विनी इंगळे ,लक्ष्मण काळे, साई राठोड ,लक्ष्मण एकुरगे, प्रतिक्षा राठोड, प्रशिक्षक म्हणून कार्यभार पाहत आहेत .विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मास्टर प्रताप राठोड यांनी केले आहे.