यवतमाळ : येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा येथे माजी विद्यार्थी यांचा स्नेहमिलन सोहळा 1997 ची बॅचेस च्या विद्यार्थ्यांनी केला साजरा . दि 14 मे रोजी माजी विद्यार्थी 1997 इयत्ता 10 वी च्या बॅचने 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्नेहमीलन सोहळा आयोजित केला आणि याची पूर्वतयारी करण्यासाठी सकाळी 10 वाजता शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान मुख्याध्यापकांचे मन भरावून गेले कार्यक्रमात मुख्याध्यापक राठोड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक मनुष्य हा आजीवन विद्यार्थीच असतो तो सदासर्वकाळ शिक्षण घेतच असतो. समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणारे हे माजी विद्यार्थी वाटलेच नाहीत. कारण आपल्या शाळेतील सोनेरी दिवस आठवून त्यांनी जो उत्साह दाखविला… ‘माझा हा बेंच..’ तू इथे बसायचा…’ या संभाषणाचा साक्षीदार असल्याने हे तर आपले वर्तमानातील विद्यार्थी अशीच भावना निर्माण झाली… शाळेविषयी जपलेला ऋणानुबंध, वर्गमित्र भेटल्याचा आनंद आणि आपली शाळा डोळ्यांमध्ये साठवून घेण्याची उत्सुकता या माजी विद्यार्ध्यांमध्ये पाहून शिक्षक हा किती श्रीमंत असतो याची जाणीव झाली…. या प्रज्ञावंत,गुणवंत माजी विद्यार्थ्यांशी बोलताना आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतून संस्काराची शिदोरी घेऊन जीवनात जी यशस्वी वाटचाल केली हीच आम्हा शिक्षकांची खरी कमाई आहे याची जाणीव झाली….या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पंखांना गगनभरारी घेण्यासाठी ज्या शाळेने बळ दिले त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या स्नेहमीलन सोहळ्याने शाळेलाही बळ प्रदान केले.यासाठी 1997 बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .यावेळी मुख्याध्यापक राठोड सर ,लोखंडे सर ,राऊत सर, शिकारे सर, तसेच या सर्वांनी जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिक्षण घेऊन उच्चपदावर जाणारे विद्यार्थी डॉ . अंकुश देवसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे , महाराष्ट पोलीस रितुराज मेडवे डॉ . मेघश्याम अंजनकर डॉ . विशाल गोटे डॉ . नंदकुमार भुते . शिक्षक अनिल आल्लडवार . शिक्षक नितीन देवसरकर . प्रेमसिंग राठोड व्यापारी . चेतन महेश्वरी व्यापारी . शिक्षक कैलास वान्नरे . अँड दिपक दिवेकर .सारंग सोईतकर बॅक मॅनेचर .विनोद तेला व्यापारी .अमोल उदावंत व्यापारी . सय्यद अकबर व्यापारी . शेख सज्जाद व्यापारी . शिक्षक मोहम्मद बिलाल .सचिन पराते बॅक मॅनेचर ॲड वैभव पत्रे उच्च न्यायलय नागपूर शेख जमीर पत्रकार शेख जहांगीर पेपर विक्रेता तथा पत्रकार. शैलेश तवर मॅनेजमेंट इंजिनीयर नाशिक ज्ञानेश्वर महाजन सलुन व्यापारी . अविनाश लोखंडे विकास अधिकारी Lic .शिक्षक शंकर बागडे तसेच विविध शासकीय सेवेत रुजू असलेले विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते .
उमरखेड प्रतिनिधी