उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.संगीता ताई काळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष मा.श्री.जयंत रावजी पाटील, उपमुख्यमंत्री मा. श्री.अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा. खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कु.सक्षणाताई सलगर व मराठवाडा विभाग अध्यक्षा सौ.वैशालीताई मोटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

सौ.संगीताताई काळे यांनी यापूर्वी जिल्हा सरचिटणीस म्हणून आणि तुळजापूर तालुका निरीक्षक म्हणून पक्ष बळकटीसाठी मोलाचे योगदान दिलेले आहे.तसेच महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन या ठिकाणी ही त्यांची सदस्य म्हणून निवड झालेली आहे.
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कु. सक्षना ताई सलगर यांनी नियुक्ती पत्र देऊन केली निवड.आपल्या परखड लेखनीतून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या अभ्यासू व्यक्तिमत्व व सामाजिक चळवळींमध्ये नेहमी सक्रिय असणाऱ्या महिला पत्रकार म्हणून सौ. संगीता काळे यांनी अल्पावधीतच नाव लौकिक मिळवलेला आहे.त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणाताई सलगर यांनी त्यांची निवड केली आहे. दिलेल्या नियुक्तीपत्रात असे नमुद केले की ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार आणि संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे ध्येयधोरण व जनमाणसातील आत्मविश्वास वाढवावा पक्ष बळकटीसाठी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील हाच उद्देश ठेऊन आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे ही दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे.सौ.संगीताताई काळे यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातून कौतुक होत अभिनंदन केले जात आहे.राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस च्या माध्यमातून जिल्ह्यात युवती व महिलांचे संघटन मजबूत करणार.-सौ.संगीता ताई काळे