गडचिरोली : एकता फाउंडेशन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने पत्रकार रमेश बामनकर यांना तथागत गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय गौरव सम्मान 2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पत्रकार रमेश बामनकर यांचे सामाजिक कार्य व ग्रामीण भागातील पत्रकारिता चे दखल घेऊन एकता फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. जय संजय रामटेके यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा चे औचित्य साधून गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सन्मानपत्र प्राप्त झाल्याबद्दल दखल न्यूज भारत चे संपादक डॉ. जगदीश वेन्नम, पत्रकार रोशन कंबगोणीवार, सुरेश मोतकुरवार राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, चिरंजीव पल्ले, अनिल पेंदाम आदिने अभिनंदन केले आहे.