फुलचंद भगत
वाशिम:-तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्यां देशांनी स्वीकारलं त्या देशाची प्रगती झाली ते विज्ञानवादी झाले आणि ज्यांनी नाकारलं ते देश अधोगतीला गेले .असे प्रतिपादन माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी काल पोहरादेवी येथे बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले .
पोहरादेवी येथे तथागत भगवान गौतम बुद्धाची 2566 वी जयंती साजरी करण्यात आली .

या जियंती निमित्ताने जगात शांति नांदावी या साठी बुद्ध तत्वज्ञानाची गरज या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अनंतकुमारी पाटील हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जी प उपाध्यक्ष व जेष्ठ विचारवंत बाबूसिंगजी नाईक ,समाज प्रबोधनकार तथा जेष्ठ पत्रकार फुलसिंग नोळे , प्रा जय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .आपल्या अध्यक्षीय भाषणात पाटील पुढे म्हणाले की ,भगवान बुद्धांनी जगाला शांती व अहिंसेचा मार्ग दाखविला . युध्द हे मानव जातीला नष्ट करणारा मार्ग आहे तर अहिंसा हा मार्ग मानवाला विकासाचा व शांतीचा मार्ग आहे .ज्यानी ज्यांनी बुधत्व स्वीकारले ते विज्ञानवादी झाले आणि बुद्धाला नाकारलं ते अंधश्रद्धेत गुरफटले . जपान ,चीन रशिया आधीनी बुद्ध स्वीकारला ते विज्ञानवादी झाले ,त्यांनी प्रगती झाली .ज्यांनी भगवान बुद्धाचे पुतळे फोडले त्या देशात आज अराजकता माजून ते देश रसातळाला गेले आहे .आम्ही बुद्धाला स्वीकारलं असत तर आम्ही पण विज्ञाना कडे गेलो असतो .म्हणून आज देशाला बुद्धाच्या तत्वज्ञानाची गरज आहे . असे ते शेवटी म्हणाले.तत्पूर्वी जेष्ठ पत्रकार फुलसिंग नोळे यांनी आपल्या व्याख्यानात तथागत गौतम बुद्धच जीवनपट उलगडून दाखविला . तर जेष्ठ विचारवंत बाबूसिंग नाईक यांनी आपल्या भाषणात म्हणाले की , भगवान बुद्धामुळे जगातील मानव जाती तत्वज्ञान ,संस्कार ,विचार, मिळाले. हिंसेची जागा अहिंसेने घेतली ,मानवात दया, करुणाचे बीज रुजल्या गेले . प्रा जय चव्हाण यांनी सांगितले की , युवकांनी बुद्ध समजून घेण्यासाठी बुद्ध तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे .बुद्ध वाचला पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.या परिसंवादाचे प्रास्तविक व संचालन पत्रकार शंकर आडे यांनी केले तर पांडुरंग मनावर यांनी आभार मानले .कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद मनवर ,सिद्धार्थ मनवर यांनी केले .