section and everything up until
* * @package Newsup */?> न भरणाऱ्या जखमा, डायबेटिक फुट , व्हेरीकोज व्हेन्स आणि हातांच्या प्लास्टिक सर्जरी शिबिर | Ntv News Marathi

सुरभि हॉस्पिटल येथे आयोजन, सोमवारी शुभारंभ


अहमदनगर :
नगर-औरंगाबाद रोडवरील सुरभि हॉस्पिटल येथे 23 मे ते व 25 मे तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात न भरणाऱ्या जखमा, डायबेटिक फूट, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा नसा , व्हेरिकोज व्हेन्स, हातांच्या व्यंगावरील प्लास्टिक सर्जरी आदी आजारांची प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. रोहित फुलवर हे तपासणी करून उपचार करणार आहेत. सोमवार दि. 23 ते बुधवार दि. 25 मे दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी चार हे शिबिर चालणार आहे,

शिबिरात न भरणाऱ्या जखमांत डायबेटिक फूट, व्हेनस अल्सर, जुन्या न भरलेल्या जखमा, व्हेरिकोज व्हेन्समध्ये व्हेरिकोज व्हेन्सवर विना चिरफाड लेझरद्वारे सवलतीच्या दरात उपचार व परत अशा जखमा होऊ नये, यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच हातांच्या शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरीत हातांच्या व्यंगावरील शस्त्रक्रिया, अपघातामुळे झालेले व्यंग, कारपेलटनेल सिंड्रोम, लहान मुले किंवा जन्मजात हातापायांचे व्यंग, ब्रेकियल प्लेक्सस इन्जुरी आदी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिर अंतर्गत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी कॅशलेस सुविधाही उपलब्ध आहे.शिबिरात सहभागी घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी 23 ते 25 मे दरम्यान सकाळी 9 ते 4 या वेळेत सुरभी हॉस्पिटल, गुलमोहर रोड कॉर्नर, नगर-औरंगाबाद रोड, सावेडी, अहमदनगर इथे सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी यांनी केले, नोंदणी साठी 9073108108 नंबर वर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *