पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे उपसरपंच रामदास चव्हाण पदासाठी रामदास चव्हाण यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.

ग्रामपंचायत अंतर्गत ठरवून दिलेल्या मुदती प्रमाणे उपसरपंच सौ तनुजा पांडुरंग शिंदे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी श्री रामदास प्रभाकर चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड झाली.
..यावेळी सरपंच रुपाली सुनिल खंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी गावचे पोलीस पाटील तुषार झेंडे माजी उपसरपंच अजित दादा पवार ग्रामपंचायत सदस्य उषा दत्तात्रे कवडे , राणी खंडाळे, सुंदर चांदगुडे व तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष लाला साळुंखे उपस्थित होते
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी – पल्लवी चांदगुडे इंदापूर