गाववासियांनी वाचला समस्यांचा पाढा
रोल संस्था अहेरीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप
गडचिरोली:- अहेरी तालुक्यातील कमलापुर परिसरातील अति संवेदनशील, अतिदुर्गम भाग असलेल्या लिंगपमली गावाला भाजपा आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य संदिप भाऊ कोरेत यांनी भेट देऊन गाव वासियाना आस्थेने विचारपूस करून चर्चा केले होते. या वेळी संदिप भाऊ कोरेत यांचे समोर गाववासी अनेक समस्याचे फाढा वाचले होते. प्रामुख्याने लिंगमपली गाव जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येतो. जिमलगठ्ठा हे अंतर २५ किमी येतो. कमलापुर केंद्र पाच किमी येतो म्हणून कमलापुर केंद्राशी जोडण्यात यावे, रेपणपली ग्राम पंचायत अंतर्गत असून रेपणपली हे अंतर बारा किमी अंतर येतो, कमलापुर ग्राम पंचायत कार्यालय पाच किमी येतो म्हणून कमलापुर ग्राम पंचायत अंतर्गत जोडावे, वीज समस्या, पाणी समस्या, गावात नाल्यांचे अभाव असे अनेक समस्या गावात दिसून आले. ही समस्या शासनाशी पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे आश्वासन कोरेत यांनी दिले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडूंब भरुन वाहत असल्याने लिंगमपली गावला पुराचा फटका बसला असून घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य भिजून गेले अनेकांचे घरे उध्वस्त झाले व नागरिकांचे शेतात ही पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट निर्माण झाली आहे.
याप्रसंगी रोल संस्था अहेरी कडून प्राप्त जीवनावश्यक किटांचे पूर पीडित लिंगमपली गावातील प्रत्येक कुटंबाला संदिप भाऊ कोरेत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. आणि या भेठीदरम्यान कमलापुर, निमलगुडम, तिमरम गावातील पूर पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात करण्यात आले.
या वेळी संदिप भाऊ कोरेत, अमित बेझलवार, श्रीधर दुग्गीरालापाठी, श्रीनिवास गादासवार, संदिप ओलेट्टीवार, अशोक आईलवार, अनिल पेंदाम,राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, कैलास सिडाम उपस्थित होते.