तहसिलदार साहेब यांना दिले निवेदन
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहाखाणीतील खनिज काढण्याचे काम जोमात सुरूआहे या प्रकल्पामुळे अनेकांना रोजागार मिळाला असला तरी पहाडी वरील खनिज वाहतुक करण्यासाठी अवजड वाहनांचा उपयोग केला जातो.सुरजागड लोहखनिज मार्गावरील आलदंडीचा पूल कमजोर आहे.जड वाहनांमुळे तो तुटून पडण्याची दाट शक्यता आहे तसे झाल्यास सर्वानाच अडचणीचे होईल तालुका मुख्यालयापासुन आठ किलोमीटर अंतरावर हा आलदंडी पुल स्थित आहे.पावसाळ्यात पुरामुळे हा मार्ग काही काळ बंद असतो आणि पुरामुळे पुलाची दशा आणखीच वाईट झाली आहे सुरजागड वरुन खनिजाच्या शेकडो अवजड वाहनांचा एटापली ते सुरजागड असा प्रवास सुरु असतो .अशा स्थितीत आलंदडी पुल तुटून पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही .असे झाल्यास याचा फटका या मार्गावर असलेल्या अनेक गावातील ग्रामस्थांनाही बसणार आहे.संबधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची लवकरात लवकर दुरूस्ती करावी.तेव्हा पर्यंत जड वाहतुक बंद करावे अशी मागणी आहे अन्यथा आंदोलनाची भूमिका घेतली जाईल.या मागणीचे निवेदन शिवसेना .काँग्रेस.भाकपा.भाजपा.यांनीॅ संयुक्त निवेदनाद्बारे दिले या प्रसंगी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष संजय चरडुके.शिवसेने चे तालुका प्रमुख मनीष दुर्गे.भाकपा चे तालुका सचिव काॅ.सचिन मोतकुरवार.भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संपत्त पैडाकुलवार.युवासेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी.शिवसेना तालुका संघटक सलीम शेख.भाकपा विध्यार्थी संघा चे स्वानंद मडावी उपस्थित होते.