शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात.
उस्मानाबाद : उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाने मिशन झिरो ड्रॉपआउट या मोहिमेंतर्गत शहरातल्या भीम नगर व काळे प्लॉट येतील घराघरातून सर्वेक्षण करून शाळाबाह्य (शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरील)तीन विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना वयो गटानुसार इयत्ता पाचवी वर्गात प्रवेश देण्यात आला.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नुसार 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शक्तीचे व मोफत शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. परंतु कोरोना महामारीच्या मागील दोन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतरित झालेली व अनेक राज्यातूनही मोलमजुरीसाठी कुटुंबे स्थलांतरित झालेली आहेत. अशा कुटुंबातील मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी महाराष्ट्रात पाच जुलै ते वीस जुलै दरम्यान मिशन झिरो ड्रॉपआउट मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेतून अंजली अशोक कांबळे, रेणूका शिवाजी इटकर, राजा यलप्पा वजनमकर या तीन विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात जि प शाळेच्या शिक्षकांना यश लाभलं आहे.सदर विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यात आली असून त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पालक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समुपदेशन करण्यात आला आहे.यामुळे सदर विद्यार्थी नियमीत शाळेत येत असून या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शिल्पा चंदनशिवे सरिता उपासे, सोनाली मुसळे ,ममता गायकवाड, बाबासाहेब जाधव, धनराज तेलंग, बशीर शेख सदानंद कुंभार, संजय रूपाजी व शाळेतील सर्व शिक्षकांनी केले. नोडल अधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पद्माकर मोरे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पालकांशी सुसंवाद साधून या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेशित करून यांना शिक्षणाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे जि प शाळेच्या शिक्षकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सचिन बिद्री : उस्मानाबाद