उस्मानाबाद : २१ व्या शतकात आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला तर विद्यार्थ्यांना नोकरी आणि स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल. म्हणून शासनाच्या हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी उपयुक्त आहे असे प्रतिपादन सहसंचालक, उच्च शिक्षण औरंगाबाद विभागाचे डॉक्टर सतीश देशपांडे यांनी केले.

उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राचार्य आणि करिअर कट्टा समन्वयक यांच्यासाठी एक दिवशीय जिल्हास्तरीय करिअर कट्टा कार्यशाळेच आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर देशपांडे यांनी करिअर कट्टा प्रमुख यशवंत शितोळे यांचे अभिनंदन केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर घनश्याम जाधव यांनी करिअर कट्टा विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करिअर कट्टा मध्ये नाव नोंदणी करण्यास समन्वयकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी करिअर कट्टा प्राचार्य प्रवर्तक म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.जयसिंग देशमुख प्राचार्य, आर पी कॉलेज उस्मानाबाद यांचे अभिनंदन आणि सत्कार प्राचार्य डॉ. दिलीप गरुड प्राचार्य डॉ. एस बी चंदनशिव प्राचार्य डॉ. दिलीप कुलकर्णी प्राचार्य डॉ. उमाकांत चेन शेट्टी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर प्राचार्य डॉ. एच एन रेडे, प्राचार्य मुंडे, यांच्या हस्ते करण्यात आला.
तीन सत्रात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यशाळेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 महाविद्यालयाचे प्राचार्य आणि 36 समन्वयक यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत करिअर कट्टाचे प्रमुख यशवंत शितोळे यांनी करिअर कट्ट्यामुळे देशभरात ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतील असाच उपक्रम आयएएस आपल्या भेटीला, आणि उद्योजक आपल्या भेटीला या सोबतच केवळ 365 रुपयांमध्ये 50 कोर्सेस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समन्वयक आणि विद्यार्थ्यांसाठी ब्रँड अँबेसिडर ची नियुक्ती केली आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यशाळेसाठी करिअर कट्टाचे जिल्हा समन्वय डॉ. संजय अस्वले डॉ. नितीन पडवळ यांनी पुढाकार घेतला त्यासाठी तालुका समन्वयक आणि महाविद्यालय समन्वयक डॉ अर्जुन कटके डॉ भारत शेळके डॉ समाधान पसरकले यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ डी व्ही थोरे, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक तसेच प्रा अंकुश कदम यांची उपस्थिती होती.
सचिन बिद्री:उस्मानाबाद