सचिन बिद्री:उस्मानाबाद
उमरगा तालुक्यातील पळसगाव येथे बुधवारी दि २७ रोजी अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर उमरगा पोलिसांनी धाड टाकून जवळपास १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोनि मनोजकुमार राठोड यांनी सपोनि आर. बी. जाधवर, पोहेकॉ दिगंबर सूर्यवंशी, सुनीता राठोड, वाल्मीक कोळी, मनाजी पाटोळे, जयहिंद वाघुलकर आदींसह सकाळी सातच्या सुमारास पळसगाव (तांडा)येथील तलावाजवळील अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच हातभट्टी दारू गाळप करणारे पसार झाले.पण पोलिसांनी केलेल्या कारवाईत घटनास्थळी उपलब्ध गूळमिश्रित रसायन,दारू बनविण्याची साधने,प्लास्टिक घागरी, लोखंडी ड्रम असे तब्बल १ लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी गुळमिश्रित उग्रवास येत असलेले रसायन जागीच नष्ट करण्यात आले असून पोना मानाजी पाटोळे यांच्या फिर्यादीवरून मनोज सीताराम पवार, मधुकर राठोड, संजय उमाजी राठोड व नीळकंठ पुना राठोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाघमारे यांच्याकडे आहे.