सचिन बिद्री:उस्मानाबाद
दि.२४ रोजी उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना छावा क्रांतिवीर सेने तर्फे ओबीसी राजकीय आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षांपासुन महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षाणचा विषय प्रलंबित पडला आसून यासाठी मराठा समाजाने राज्यामध्ये लाखो कराड़ोचे मोर्चे काढले परंतु अद्याप मराठा समाजाला आरक्षण भेटले नाही दरम्यान मराठा समाजाचे अनेक बांधव शहिद झाले. मराठा मोर्चामधील संभाजीनगर येथील शहिद बांधव काकासाहेब शिंदे यांचा चौथा स्मृतिदिन होता.आमचे बांधव शहिद होऊन 3 ते 4 वर्ष झाले परंतु तरीही अद्याप “मराठा आरक्षण” हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
ज्याप्रकारे शिंदे – फडणवीस सरकार सत्तेमध्ये आल्याबरोबर OBC(ओ बी सी) समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला त्याच पद्धतीने लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा व हे काम मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मार्गी लावु शकतील असा मराठा समाजाला विश्वास आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करावा व पाठपुरावा करून मार्गी लावावा अशी मागणी उमरगा – लोहारा मतदार संघातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावर छावा क्रांतिवीर सेनेचे तालुकाध्यक्ष विष्णु भोसले शहराध्यक्ष सुमित घोटाळे विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष शैलेश लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.